beed
beed

चप्पूतुन येऊन तांड्यावरील मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य

बीड : गाव आणि तांड्याला जोडणाऱ्या नदीवरील पुल वाहून गेल्याने मतदारांनी चप्पूतून येऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव येथे महसूल प्रशासनाने ही सोय करुन दिली. 

माजलगाव विधानसभा मतदार संघातील खळवट लिंबगाव (ता. वडवणी) ग्रामपंचायती अंतर्गत भिमाई तांडा आहे. या तांड्यावरील 65 मतदारांचे मतदान हे खळवट लिंबगाव येथे आहे. रविवार - सोमवारच्या रात्री तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सरासरी 65 मिमी मिटर झालेल्या पावसाने या गाव - तांड्याला जोडणारा पुल वाहून गेला. त्यामुळे तांड्यावरील मतदारांना खळवट लिंबगावला येणे शक्य नव्हते. मात्र, महसूल प्रशासनाने त्यांना तत्काळ चप्पूची सोय करुन दिली.

दुपारी चप्पूमधून येऊन मतदारांनी आपला हक्क बजावल्या. यासाठी वडवणीच्या तहसिलदार तथा माजलगावच्या अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी सुरेखा स्वामी यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या तत्परतेबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com