Vidhan Sabha 2019 : औरंगाबाद मध्यमध्ये मतदानात दहा टक्के घसरण

  Voting in Aurangabad madhy constituency
Voting in Aurangabad madhy constituency

औरंगाबाद - विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात केवळ एक लाख 92 हजार मतदारच आमदार ठरविणार आहेत. सोमवारी (ता. 21) 14 उमेदवारांचे नशीब ईएमव्हीमध्ये बंद झाले असले तरी गतवेळेपेक्षा (2014) यावेळी दहा टक्‍क्‍यांनी मतदान घसरले आहे. 

विधानसभेच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात वर्ष 2014 च्या निवडणुकीत 69.33 टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र मतदारांचा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला असून, तब्बल दहा टक्‍क्‍यांनी कमी मतदान झाले आहे. या मतदारसंघातील 62.28 टक्के पुरुष मतदारांनी तर 55.91 टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तीन लाख 25 हजार 735 मतदारांपैकी एक लाख 92 हजार 805 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, 60.12 टक्के हे मतदारच मध्यचा आमदार कोण हे ठरवणार आहेत. 
  
14 टेबलवर होणार मतमोजणी 
मतमोजणीला गुरुवारी (ता.24) सकाळी आठपासून सुरवात होणार आहे. देवगिरी महाविद्यालयाजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, 14 टेबलवर ही मतमोजणी केली जाणार आहे. 324 मतदान केंद्र असल्यामुळे मतमोजणीच्या 24 फेऱ्या होणार आहेत. एक लाख 92 हजार 805 मतदानाची मोजणी केली जाणार असून, त्यापूर्वी गुरुवारी सकाळी आठपूर्वी प्राप्त होणाऱ्या पोस्टल बॅलेटची मोजणी होणार आहे. पावसामुळे मतमोजणीत अडथळा येऊ नये याकरिता वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com