बेलकुंड येथे मतदान जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजले असून निवडणूक आयोग देखील यात अग्रेसर आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, यासाठी जनजागृती मोहीम तालुक्यातील ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. यासाठी आयोगाच्या स्वीप पथकाने बेलकुंड येथे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृती केली.  
 

लातूर ः विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजले असून निवडणूक आयोग देखील यात अग्रेसर आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी, यासाठी जनजागृती मोहीम तालुक्यातील ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे.

यासाठी आयोगाच्या स्वीप पथकाने बेलकुंड येथे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी जनजागृती केली.

 
औसा विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, निवासी तहसीलदार वृषाली केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, विस्तार अधिकारी राम कापसे, केंद्र प्रमुख कमलाकर सावंत, महादेव खिचडे, दीपक क्षीरसागर यांनी बोरफळ, बेलकुंड आदी गावात मतदानाच्या सर्व प्रक्रियेबाबत माहिती दिली.

महिला, गर्भवती महिला, आणि वृध्दांना तातडीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असून लहान बालकांसाठी केंद्रावर खेळण्याची सोय उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. निर्भयपणे मतदान करुन आपला प्रतिनिधी निवडावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting awareness at Belkund