व्हीव्हीपॅटवरील मतदानाची नोंद पाच वर्ष राहणार

vvpat
vvpat

लातूर : येत्या लोकसभा निवडणूकीत देशभर आधुनिक यंत्राद्वारे मतदान घेण्यात येणार आहे. यात कोणाला मतदान केले, हे दाखवणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनची मतदारांना मोठी उत्सुकता आहे. या उत्सुकतेसह मतदान यंत्रांवर राजकीय पक्षांकडून संशयाचे वादळ उठवले जात आहे.

या पार्श्वभूमीवर मतदान यंत्रांची रचना व मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी (ता. पाच) मतदानातील पारदर्शकता पत्रकारांच्या निदर्शनास आणली. व्हीव्हीपॅटमध्ये करन्सी (नोटांसाठी वापरला जाणार विशेष कागद) पेपरचा वापर करून त्याची थर्मल प्रिटींग असल्याने त्यावरील मतदानाची नोंद ही पाच वर्ष टिकून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटवर कोणाला मतदान केले, त्या उमेदवाराचे नाव, त्याचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक व त्याचे निवडणूक चिन्ह मतदारांना सात सेकंद दिसणार आहे. मतदान यंत्रांचा आत्मा असलेल्या कंट्रोल युनिटमध्ये अद्ययावत बदल झाले असून हे युनिट मतदान प्रक्रियेचा आत्मा आहे. बंगळुरूच्या भेल कंपनीने तयार केलेल्या एमथ्री व्हर्जनच्या यंत्रात आधुनिकता असून हे मशीन स्वतःच स्वतःतील दोष डिसप्लेवर दाखवते. त्याला जोडलेल्या यंत्रातील दोषही ते दाखवून देते. या यंत्रांसह मतपत्रिका लावलेले बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅट मशीनवर बारकोडींग आहे. कंट्रोल युनिटला 24 बॅलेट युनिट जोडणे शक्य असून एकावेळी 384 उमेदवारांच्या निवडणुकीचे मतदान घेता येते. यंत्रांना आधुनिक सील असून यंत्र उघडल्यास त्याचा आपोआप चुरा होतो. यंत्रांवरील क्रमांकावरून ते कोठेही आहे, हे ऑनलाईन प्रणालीतून तातडीने सापडते, असेही श्रीकांत यांनी सांगितले. दहा पत्रकारांनी केलेल्या डमी मतदानाची लागलीच मतमोजणी करणयात आली. उपलब्ध एका टक्का यंत्रांवर बाराशे, दोन टक्के यंत्रावर हजार तर दोन टक्के यंत्रांवर पाचशे डमी मतदान घेऊन ते समाजातील प्रमुख घटकांना दाखवणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.  या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, तहसीलदार अहिल्या गाठाळ, भेलचे पथकप्रमुख अंकुर सैनी, अभियंता हेमंत कुमार उपस्थित होते.

लोकशाहीचा आत्मा असलेल्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराच्या मतदानाला मोठे महत्व आहे. एकाही मतदाराचे मतदान बाद होऊ नये म्हणून यंत्रांचा वापर होत आहे. यंत्रांतील आधुनिकता व व्हीव्हीपॅटमुळे मतदान प्रक्रियेत मोठी पारदर्शकता आली आहे. गरज पडल्यास यंत्रासोबत व्हीव्हीपॅटवरील नोंदलेले मतदानही मोजण्यात येणार आहे. गुप्त मतदान ही लोकशाहीची सुंदरता असून मतदारांना कोणाला  मतदान केले, याचा फोटो काढता येणार नाही. 
- जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com