आमदार निवडीसाठी आज मतदान 

बदनापूर : मतदान साहित्यांसह रवाना होताना मतदान अधिकारी व कर्मचारी
बदनापूर : मतदान साहित्यांसह रवाना होताना मतदान अधिकारी व कर्मचारी

जालना -  जिल्ह्यात जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी आणि परतूर या पाच विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (ता. 21) सकाळी सात ते सायंकाळी सहा यादरम्यान मतदान होत आहे. पाच मतदारसंघांत एकूण 79 उमेदवार रिंगणात आहेत. 

नागरिकांना मतदान करता यावे यासाठी 1 हजार 653 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी 67 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. या निवडणुकीत 15 लाख 57 हजार 283 मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यामध्ये 7 लाख 36 हजार 365 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानप्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. या कामासाठी सुमारे 1700 महसूल कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्याला केंद्रीय राखीव दलाच्या पाच, तर राज्याकडून एक कंपनी अशा एकूण सहा कंपन्या प्राप्त झाल्या आहेत. 
जालना मतदारसंघात 32 उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात एकूण 3 लाख 33 हजार 349 मतदार असून यात 1 लाख 77 हजार 196 पुरुष, तर 1 लाख 56 हजार 151 महिला मतदार आहेत. 
बदनापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 14 उमेदवार निवडणूक लढवीत असून या मतदारसंघात एकूण 3 लाख 78 हजार 6 मतदार असून यामध्ये 1 लाख 61 हजार 566 पुरुष, तर 1 लाख 46 हजार 240 महिला मतदार आहेत. 
परतूर मतदारसंघात 14 उमेदवार रिंगणात असून मतदारसंघात 2 लाख 96 हजार 166 मतदार आहेत. यात 1 लाख 55 हजार 637 पुरुष, तर 1 लाख 40 हजार 529 महिला मतदारांचा समावेश आहे. भोकरदन मतदारसंघात 6 उमेदवार निवडणूक लढत असून, या मतदारसंघात 3 लाख पाच हजार 534 मतदार आहेत. यात 1 लाख 60 हजार 834 पुरुष, तर 1 लाख 44 हजार 875 महिला मतदारांची संख्या आहे. घनसावंगी मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 3 लाख 12 हजार 207 मतदार आहेत. यात 1 लाख 62 हजार 501 पुरुष, तर 1 लाख 50 हजार 221 महिला मतदार आहेत. 

ईव्हीएम, व्हीव्हीपॅटचे वाटप 
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मतदानप्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्‍यक ते साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 2 हजार 289 बॅलट युनिट, 1 हजार 653 कंट्रोल युनिट व 1 हजार 653 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरविण्यात आली आहे. याशिवाय 452 बॅलट युनिट, 300 कंट्रोल युनिट व 461 व्हीव्हीपॅट मशीन्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील या सर्व मतदान केंद्रांवर एकूण 7 हजार 996 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

साडेसात हजार दिव्यांग मतदार 
जिल्ह्यात एकूण 7 हजार 626 दिव्यांग मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदानावेळी दिव्यांगांना अडचण होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर दिव्यांगांना आवश्‍यक त्या सर्व सुविधाही पुरविण्याची तयारी करण्यात आली आहे. 
 
ओळखीचे 11 पुरावे धरणार ग्राह्य 
मतदानासाठी मतदार ओळखपत्राशिवाय अन्य 11 पुरावे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग परवाना, केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/सार्वजनिक मर्यादित कंपन्याद्वारे कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्र, बॅंक/पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, एनजीआरअंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्र, खासदार/आमदार यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्रे, आधारकार्ड आदी ओळखपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत, असे कळविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com