पालकमंत्र्यांचा फोन जाताच आनंदवाडीमध्ये मतदान सुरू

प्रशांत शेटे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

चाकूर (जि. लातूर) : सलग तीन वर्षापासून पिकविमा मिळत नसल्याने आनंदवाडी (ता. चाकूर) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घातला होता. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मोबाईलवरून संवाद साधताच ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेत मतदानाचा सुरूवात केली. 

आनंदवाडीच्या शेतकऱ्यांनी पिकविम्यासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन आंदोलन ही केले. परंतू विमा कंपनीकडून याची दखल  घेतली जात नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. सोमवारी (ता.१५) तहसीलदारांना निवेदन दिले होते. गुरूवारी सकाळी मतदानाला सूरूवात झाल्यानंतर गावातील एकानेही मतदान केले नाही.

भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांनी गावात जाऊन भेट दिली, ग्रामस्थांसोबत चर्चा करून पालकमंत्री सभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी संवाद घडवून आणला. त्यांनी पिकविमा मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला. दुपारी एक नंतर मतदानाला सुरूवात झाली असून गावातील एका मतदान केंद्रावर ११६४ मतदार आहेत.
 
Web Title: voting starts in anandwadi after guardian minister call