22 नमुने तपासणी अहवालाची प्रतिक्षा

File Photo
File Photo

नांदेड : जिल्ह्यात आजपर्यंत ‘कोरोना’ संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही, ही नांदेड जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.  बुधवारी (ता.१६) एप्रिलला २० संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबादच्या लॅबमध्ये पाठविले आहेत. 

आजपर्यंत एकुण २९६ नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी २२६ नमुने निगेटिव्ह आले असून, ६५ संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी ७४ हजार ३२६ असून, त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. 

अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी

कंधार तालुक्यात- नऊ हजार ४८१, किनवट- दोन हजार ५२६, देगलूर- सात हजार १९५, धर्माबाद- एक हजार ५०५, बिलोली- चार हजार ४१३, लोहा- चार हजार ९६३, उमरी- एक हजार ९३८, हदगाव- पाच हजार ९८२, भोकर- दोन हजार २२०, मुखेड- ११ हजार ६३७, मुदखेड- एक हजार ७८०, अर्धापूर- दोन हजार ३५६, माहूर- तीन हजार ४३७, हिमायतनगर- एक हजार ९७९, नायगाव- सहा हजार ३८३, नांदेड तालुका- दोन हजार ४४२ तर नांदेड वाघाळा शहर महापालिका नांदेड- चार हजार ८९ अशी आहे. जिल्ह्यात एकूण प्रवासी संख्या ७४ हजार ३२६ एवढी असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.    

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनांचे पालन व्हावे 
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्तपेढीने घ्यावयाची काळजी याबाबत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन नांदेड जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त ज. निमसे यांनी केले आहे.

सोशल डिस्टन्सकडे दुर्लक्ष नको

रक्तदान शिबिरावेळी (सोशल डिस्टंसिंगचे) सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करावे. परदेशी प्रवासाचा इतिहास, ‘कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क, कोरोना झालेल्या व्यक्ती यांच्याकडून केलेले रक्तदान शिबिरात तसेच रक्तपेढीत रक्त संकलित करू नये. रक्त संकलनाच्यावेळी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे वापरापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे. रक्तपेढीचे कर्मचारी, अधिकारी यांनी नियमितपणे साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे.

याबाबी पाळाव्यात 
रक्तपेढीचे कामे करताना हातमोजे व मास्क यांचा वापर करावा. रक्तपेढीत येणाऱ्या व्यक्तींना मास्क वापरण्याची सक्ती करावी. त्यांच्या वापरासाठी रक्तपेढीच्या प्रवेशद्वारात हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवावे. शिबिराच्यावेळी याप्रमाणे सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. कोणत्याही परिस्थितीत शिबिराच्यावेळी गर्दी होणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी. कॅम्पची जागा व परिसर स्वच्छ असावा. रक्तपेढीद्वारे कोविड-१९ बाबत कॅम्पच्या ठिकाणी जनजागृती करावी. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी रक्तपेढयांनी विशेष काळजी घेऊन अधिकाधिक रक्त संकलन करावे, असेही आवाहन जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्यांना करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com