वाकी परिसरात चांगल्या पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

चिंचोली लिंबाजी - वाकी (ता. कन्नड) परिसरात जून महिन्याच्या प्रारंभी परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले. या पावसाच्या जोरावर सर्वत्र पेरणी झाली. पुढे चांगल्या पावसाची अपेक्षा असताना एकही पाऊस झाला नाही. पेरणीनंतरच्या रिमझिम पावसावर दीड महिना पिकांनी तग धरून बाळसे धरले. या काळात पेरणीनंतरची सर्वच पिकांत मशागत, फवारण्या, तण व्यवस्थापन, खतांच्या मात्रा यावर पूर्ण खर्च करण्यात आला. पुढे पिकांची काढणी व हातात उत्पन्न असे समीकरण बनले. 

वाकी (ता. कन्नड) येथील शेतकरी गणेश भगवानराव जंजाळ यांनी  पावसाअभावी सुकलेल्या दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकात ट्रॅक्‍टरद्वारे रोटाव्हेटर फिरवून सोयाबीन क्षेत्र मोडून टाकल्याची घटना बुधवारी (ता.आठ) घडली. यामुळे शेतकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या पंधरा -वीस दिवसांपासून परिसरात पाऊसच नसल्याने मका, कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, तुरी, भुईमूग, आद्रक यासह सर्वच पिके पावसाअभावी सुकले असल्याने शेतकरी वर्ग कमालीचा खचला आहे. ठिबक सिंचनावरील कपाशीचे काही  क्षेत्र शेतकरी जगवण्याचा प्रयत्न करीत असला तरी कपाशी पिकावर सुरवातीपासूनच शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने  कपाशी पिकातून उत्पन्न हाती लागेल यात शंका आहे. गेल्या आठवड्यात एखादा पाऊस झाला असता तर अशी बिकट अवस्था पिकांची झाली नसती. आता यापुढे जरी पाऊस झाला तरी वेळ निघून गेलेली असून पाऊस झाला तरी उत्पन्नात मोठी घट होणार आहे असे तग धरून उभ्या असलेल्या पिकावरून लक्षात येते. याबाबत शासनाच्या महसूल व कृषी विभागाने सुकलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून रोजगार हमी योजनेच्या कामांना सुरवात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

आपल्या शेतातील उभ्या पिकात रोटाव्हेटर का फिरविले असा प्रश्‍न गणेश जंजाळ यांना केला असता पावसाअभावी माझे  दोन एकरांवरील सोयाबीन पूर्ण सुकले होते. पाऊस झाला तरी सुकलेल्या पिकाला काहीच येणार नाही याची खात्री झाली होती. त्यामुळे टोकाचा निर्णय घेऊन पीक मोडले.

Web Title: Waiting for good rains in Waki area