वाळूजमधील कंपन्यांवर हल्ला ; जाळपोळ, तोडफोडप्रकरणी 20 आंदोलक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

वाळूजसह कंपन्यांतील तोडफोड, मारहाण व जाळपोळ केल्याप्रकरणी 20 आंदोलकांना अटक करण्यात आली. गुरुवारी (ता. 9) रात्रीतून पोलिसांनी धरपकड केली.

औरंगाबाद : वाळूजसह कंपन्यांतील तोडफोड, मारहाण व जाळपोळ केल्याप्रकरणी 20 आंदोलकांना अटक करण्यात आली. गुरुवारी (ता. 9) रात्रीतून पोलिसांनी धरपकड केली. वाळूज भागात तसेच येथील विविध कंपन्यात आंदोलकांनी तोडफोड केली. कार्यालय फोडून काहींना तेथे मारहाणही करण्यात आली.

पोलिसांचे वाहनांसोबतच अनेक वाहने पेटवून जाळपोळ करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी धुडगूस घालणाऱ्या आंदोलकांची धरपकड सुरु केली. याप्रकरणी दंगल आणि जाळपोळीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, 20 जणांना अटक करण्यात आली. घटनास्थळी ही कारवाई केली असून, अजून काहींना ताब्यात घेतले जात आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

Web Title: In waluj company attacked and destroyed 20 peoples arrested