धडकेत मृत झालेल्याच्या अंगावरून गेली अनेक वाहने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

वाळूज - वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहिगाव बंगल्याजवळ ४५ ते ५० वर्षे वयाच्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तो ठार झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) रात्री नऊच्या सुमारास नगर रोडवर घडली. 

अज्ञात व्यक्ती हा रस्ता ओलांडत असावा, असे पोलिसांनी सांगितले. त्यास गंगापूरवरून औरंगाबादकडे येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर मृताच्या अंगावरून अनेक वाहने गेली असावीत. त्यामुळे त्याच्या चिंधड्या झाल्या होत्या. त्याचा एकही अवयव शिल्लक नव्हता. फक्त पायाचा आणि हाताचा पंजा दिसत होता. त्याच्या शरीराचे तुकडे १०० ते २०० फुटांवर पसरले होते. रात्र असल्यामुळे तो पायी जात होता की काय, याविषयी अधिक माहिती मिळू शकली नाही. जवळपास एकही दुचाकी किंवा कुठले वाहन दिसले नाही. वाळूज पोलिस आणि दोन रुग्णवाहिका घटनास्थळी होत्या. वाळूज पोलिस त्याचे विखुरलेले तुकडे जमा करून घाटीत घेऊन गेले.

Web Title: waluj marathwada news death in accident

टॅग्स