कंटेनर-कार अपघातात सोलापूरचा शिक्षक ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

वाळूज - सोलापूरहून औरंगाबादकडे येणारी एक स्विफ्ट कार महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरवर पाठीमागून धडकली. यात कारमधील एक जण जागीच ठार झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात वाळूज महामार्गावरील पंढरपूर येथे शनिवारी (ता. १६) पहाटे चार वाजताच्या सुमारास झाला. राहुल अरविंद महामुनी (३०, रा. माहूद ता. सांगोला जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे. 

व्यवसायाने शिक्षक असलेले राहुल हे गिरीश प्रकाश गायकवाड आणि प्रकाश भानुदास गायकवाड (रा. कडलास ता. सांगोला, जि. सोलापूर) या पिता-पुत्रांसह स्विफ्ट कारने (एमएच- ४५, एन- ७५८०) न्यायालयीन कामासाठी औरंगाबादकडे येत होते. वाळूज परिसरातील पंढरपूर येथे त्यांची कार एका कंटेनरला पाठीमागून धडकली. यात कारचा चुराडा होऊन राहुल जागीच ठार झाले. चालक गिरीश (२७)  व त्यांचे वडील प्रकाश (५८) हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचालक कंटेनरसह घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

नातेवाइकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय  
या अपघातात ठार झालेले राहुल हे एका संस्थेत शिक्षक असून, त्यांचा व संस्थेचा वाद सुरू होता. या वादासंदर्भात याचिका दाखल करण्यासाठी ते गायकवाड पिता-पुत्रांसह औरंगाबादकडे जात होते. हा अपघात नसून घातपात आहे, असा संशय राहुल यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला. या बाबत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, हा घातपाताचा प्रकार वाटत नाही; मात्र नातेवाइकांची तक्रार आल्यास त्या दिशेने तपास करण्यात येईल.

Web Title: waluj marathwada news teacher death in container-car accident