आरक्षणाचे लेखी आश्‍वासन हवे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

मराठा आरक्षणाचे लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय माघार नाहीच, असा पवित्रा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी घेतला आहे. परळीत ठिय्या आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह व पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आंदोलकांची शनिवारी भेट घेतली.
 

बीड : मराठा आरक्षणाचे लेखी आश्‍वासन दिल्याशिवाय माघार नाहीच, असा पवित्रा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांनी घेतला आहे. परळीत ठिय्या आंदोलनाचा शनिवारी चौथा दिवस होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह व पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आंदोलकांची शनिवारी भेट घेतली.

दरम्यान, आंदोलकांसाठी जेवणाची सोय व्हावी म्हणून स्वयंपाकगृहासाठी पत्र्याची शेड उभारली असून, वॉटरप्रूफ मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर प्रश्‍नांसाठी बुधवारी (ता. 18) परळीत पहिला मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. यानंतर आरक्षणाचा निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही, असा पवित्रा घेत येथील तहसील कार्यालय परिसरात ठिय्या धरला आहे. आंदोलनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. परळी परिसरातील गावांमधून आंदोलनाला समर्थन वाढत असून, प्रत्येक गाव एक दिवस ठिय्या आंदोलनात सहभाग घेऊन जेवणाचा खर्च उचलणार आहे. 

माजलगाव येथे आंदोलकांना केलेल्या मारहारणीच्या निषेधार्थ वडवणीत बाजारपेठ बंद ठेवून निषेध करण्यात आला. पाटोदा येथे शुक्रवारी (ता. 20) सुरू केलेले ठिय्या आंदोलन शनिवारीही सुरूच होते. आंदोलकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. बीड तालुक्‍यातील ढेकणमोह फाट्यावरही रास्ता रोको करण्यात आला. 

Web Title: want Reservation has a written assurance