मका पिकावर कणीस पोखरणाऱ्या अळीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

तळेगाव (ता. फुलंब्री) परिसरातील मका पिकावर कणीस पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कणीस अवस्थेत असणारे मका पीक हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव, सावखेडा, पिंपरी, पिंपळगाव कोलते, टाकळी, रिधोरा, धानोरा आदी गावांत मका पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. खरीप पेरणी केल्यापासून मकावर आलेल्या खोड अळीवर शेतकऱ्यांनी दोन वेळेस औषध फवारणी करून मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविले होते.

तळेगाव, ता. 28 (जि.औरंगाबाद) ः तळेगाव (ता. फुलंब्री) परिसरातील मका पिकावर कणीस पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कणीस अवस्थेत असणारे मका पीक हातातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव, सावखेडा, पिंपरी, पिंपळगाव कोलते, टाकळी, रिधोरा, धानोरा आदी गावांत मका पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात आहे. खरीप पेरणी केल्यापासून मकावर आलेल्या खोड अळीवर शेतकऱ्यांनी दोन वेळेस औषध फवारणी करून मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविले होते.

 

परिसरात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस नसल्याने मकासह सर्वच पिके सुकू लागली आहेत. ऐन भरात असणाऱ्या मकावर कणीस पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. थोड्याफार ओलाव्यावर कशीतरी तग धरून असणारे मका पिकावर कणीस पोखरणाऱ्या अळीची संख्या प्रतिकणसात तीन ते चार अळी असल्याने धोकादायक प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने हाताशी आलेले मका पीक वाचवावे तरी कसे, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. मका पीक मध्यम अवस्थेत असताना परिसरातील शेतकऱ्यांनी एकरी पाच हजारांपर्यंत औषध फवारणीचा खर्च करूनही अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी नुकसानाच्या खाईत ढकलला गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Warm Attack On Cron Crop