वरठाण तलावाला लागली गळती

बनोटी (ता. सोयगाव) ः वरठाण तलावाला लागलेली गळती.
बनोटी (ता. सोयगाव) ः वरठाण तलावाला लागलेली गळती.

बनोटी (जि.बातमीदार) ः वरठाण (ता.सोयगाव) तलाव भरण्याच्या स्थितीत असताना तलावाच्या सांडव्यातुन मोठ्या प्रमाणावर होणारी गळती आणि भिंतीना मोठ-मोठ्या वृक्षांनी विळखा घातला आहे. त्यामुळे तलावास मोठा धोका निर्माण झाल्याने तलावाजवळची ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.


मराठवाडात ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी टॅंकरची वाट पाहावी लागत असताना सोयगाव तालुक्‍यातील बहुतेक छोटे-मोठे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. मात्र पाटबंधारे विभागाच्या डिसाळ कारभार आणि दुर्लक्षामुळे प्रकल्पांच्या भिंतीना मोठ-मोठ्याला वृक्षानी विळखा घातला आहे, तर बनोटी, पळाशी, किन्ही, वरठाण प्रकल्पांना गळती लागुन लाखो लीटर पाणी वाहुन वाया जात आहे.


वरठाण तलाव सध्या ओसंडून वाहण्यासाठी अवघा एक फुट बाकी आहे. सांडव्याला चार ते पाच ठिकाणी पडलेल्या भगदाडातून दररोज लाखो लिटर पाणी वाहुन जात आहे. चार वर्षांपूर्वी तलावाचा सांडवा दुरुस्तीचे काम करण्यात आले. सदरील काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने सांडव्याच्या भिंतीस पूर्वीप्रमाणे मोठी गळती लागली आहे. मागील वर्षी तलाव पुर्ण क्षमतेने भरुन देखील गळतीमुळे तलाव फेब्रुवारी महिन्यातच कोरडा पडला होता. त्यामुळे वरठाणवासींयांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. यावर्षी देखील गळतीने तलावाची पाणी पातळी कमी होऊन भविष्यात वरठाणवासीयांनी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार तर आहेच.

मात्र तलावातुन होणारी गळती वाढतच चालल्याने मोठी हानी होण्याच्या शक्‍यतेने ग्रामस्थ भयभीत देखील झाले आहेत. तलावाच्या दोन्ही बाजूंकडील भिंतीवरील झाडेझुडपे वेळीच काढली गेली नाही. झुडपांची वृक्ष झाल्याने त्याची मुळ्या खोलवर जाऊन भिंतीवर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. तलावाच्या भिंतीवर बाभूळ, सिसम असे काही वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जंगली प्राणी, सरपटणारे विषारी सर्पाचे वास्तव्य देखील झाल्याने तलावाच्या आसपासच्या शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. तरी लघु सिंचन विभागाने लक्ष देऊन येथील भिंतीवरील वृक्षाची तोड करुन तसेच सांडव्याच्या भिंतीवर पडलेले भगदाड बंद करण्याकरिता चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com