वसमतसह जवळा बाजार समितीवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा

शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांचे आवाहन
hingoli
hingolisakal

वसमत : वसमतसह जवळाबाजार बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके यांनी केले आहे. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आबासाहेब सवंडकर तर उपाध्यक्षपदी रमेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष व नवनिर्वाचीत संचालक मंडळाचा तालुका प्रमुख राजू चापके, प्रल्हादराव राखुंडे, सरपंच भगवानराव कावळे, सखाराम व्यवहारे, नामदेवराव गोमासे यांनी सत्कार केला. निवडणुकीत जय भवानी शेतकरी विकास पॅनेलने १३ पैकी १२ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. राजू चापके म्हणाले की, वसमत विधानसभा मतदार संघातील बहुतांश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत.

खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळाले आहे. शिवसेनेकडून आता वसमत व जवळाबाजार बाजार समितीच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या दोन्ही बाजार समित्या ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे. यावेळी गावातील रामभाऊ सवंडकर, नरहरी सवंडकर, जिजाभाऊ सवंडकर, जगन्नाथ सवंडकर, प्रा. रामचंद्र सवंडकर, कैलास सवंडकर, रंगनाथ सवंडकर, शेखर धबडगे, रतन इंगोले यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित अध्यक्ष आबासाहेब सवंडकर यांनी संचालक मंडल व ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासाला कदापी तडा न जाऊ देता सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्य करीत राहील, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com