कचरा प्रक्रिया काम पाडले बंद 

माधव इतबारे 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

औरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी दीडशे टनाच्या प्रकल्पाला विरोध करत गुरुवारी (ता. 6) काम बंद पाडले. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्‍न पुन्हा गंभीर बनण्याची शक्‍यता आहे. 

औरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र चिकलठाणा परिसरातील शेतकऱ्यांनी दीडशे टनाच्या प्रकल्पाला विरोध करत गुरुवारी (ता. 6) काम बंद पाडले. त्यामुळे शहरातील कचरा प्रश्‍न पुन्हा गंभीर बनण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील कचराकोंडीला नऊ महिने उलटले आहेत. मात्र अद्यापपर्यंत कचऱ्याचा प्रश्‍न पूर्णपणे सुटलेला नाही. महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चिकलठाणा व पडेगाव येथे रोज दीडशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मिती तर हर्सूल येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यानुसार चिकलठाणा येथील काम प्रगतिपथावर असून, पडेगाव येथील जागेच्या वादामुळे सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी कामाला स्थगिती दिली आहे.

दरम्यान गुरुवारी सकाळीच चिकलठाणा येथे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक जमा झाले व त्यांनी प्रक्रिया प्रकल्पाचे काम बंद पाडले. महापालिकेने फक्त अडीच एकरावर प्रकल्प सुरू करणार असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात 15 एकरावर प्रकल्प उभारला जात आहे, सध्या सुरू असलेल्या 18 टन प्रक्रिया मशिनचे काम समाधानकारक नाही, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान दुपारपर्यंत महापालिकेचा एकही अधिकारी कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे फिरकला नाही. 

हजारो टन कचरा शहरात पडून 
शहरात सध्या सुक्‍या कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. विविध ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये महापालिकेने हजारो टन कचरा साठवून ठेवला आहे. या कचऱ्याला आगी लावण्यात येत असल्याने शहराच्या प्रदूषणा

Web Title: waste process work become close