अवकाळी पावसाचा फटका, शहरातील पाणीपुरवठा विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

औरंगाबाद - वादळी वाऱ्यामुळे रविवारी (ता. सात) दिवसभरातून तीनवेळा महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान 24 तास तरी लागतील. सोमवारी (ता. आठ) 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

महापालिकेने यापूर्वी शटडाऊन घेतला असता, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा वेळ लागला होता. त्यानंतर रविवारी वादळी वाऱ्याने फारोळा येथील पाणीपुरवठा यंत्रणेचा जलशुद्धीकरण यंत्रणेचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जुन्या 700 मिमी आणि दुसऱ्या जलवाहिनीसाठी पंप बंद पडले. नंतर वीजपुरवठा सुरू झाला खरा मात्र काही वेळातच दोनवेळा वीज गायब झाली.

वीजपुरवठा सुरळीत झाल्याची खात्री झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. याच काळात पाणी बॅक प्रेशरने मागे आल्यानंतर रात्री ढोरकीनजवळ व्हॉल्व्ह खराब झाला होता. तो दुरुस्त करण्याचे कामही महापालिकेने हाती घेतले. हे काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा सुरू करता आला नाही. शेवटी वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा दोन्ही सुरळीत झाल्यानंतर नक्षत्रवाडीपासून 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीमार्फत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला. मात्र काल ज्या भागाला पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते त्या भागातील जलकुंभामध्ये पाणी न पोहचल्याने पाण्याच्या टाक्‍यांची पातळी घसरली. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा योग्य ती लेव्हल येईपर्यंत टाक्‍या भरण्याचे काम सुरू होते. परिणामी 1400 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरून शहरातील ज्या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा होणार होता तेथे पाणीपुरवठा करता आला नाही.

Web Title: water connection disconnect by storm rain