पाणीदार गाव बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे

नवनाथ इधाटे
बुधवार, 16 मे 2018

पाण्याचे गांभीर्य ओळखा - अनुराधा चव्हाण
गेल्या चार-पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे गांभीर्य ओळखून गावागावात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करणे काळाची गरज असल्याचे शांती प्रतीष्ठाच्या  अध्यक्षा अनुराधा चव्हाण यांनी सांगितले. तसेच शहरी भागातून अनेक संस्था जलसंधारणाचे कामे करीत आहे. याच धर्तीवर शांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यात अनेक ठिकाणी जलसंधारणाचे काम करण्यात येत आहे.

फुलंब्री : सततच्या दुष्काळाचा सामना करता करता शेतकरी मेटाकुटीस येऊन त्रस्त झाला आहे. त्यामुळे दुष्काळाच्या चक्राशी दोन हात करण्यासाठी गावातील सर्वांनी पुढाकार घेऊन आपले गाव पाणीदार बनवावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी रविवारी (ता.13) केले.

फुलंब्री तालुक्यातील जानेफळ येथे अधीक्षक अभियंता चव्हाण यांनी श्रमदान केले. त्यावेळी ते बोलत होते. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीने सहभाग नोंदविला आहे. या 53 गावाच्या प्रत्येकी चार प्रतिनिधींना पाणी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने (अंबेजोगाई जि. बीड) येथे टप्याटप्याने तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठीच्या उपाययोजना करावयाच्या बद्दल सखोल माहिती देण्यात आली.तालुक्यातील अनेक गावांत पाणी फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला पाणी फाउंडेशन व शासनाच्या वतीने पारितोषिके देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकसभागाची चळवळ गावागावात उभी राहिली आहे. लोकसहभागाच्या मध्यानातून करण्यात येणाऱ्या कामांना हळूहळू गती येत आहे. त्याच धर्तीवर जानेफळ येथे पाणी फाउंडेशन व लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करण्यात येत आहे.

या श्रमदानाला जिल्हा परिषद सदस्य अनुराधा चव्हाण, संतोष तांदळे, सरपंच कृष्णा गावंडे, लड्डू पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.चव्हाण यांच्यासह अनेकांनी श्रमदान केले. पुढे बोलतांना श्री. चव्हाण म्हणाले कि, जमिनीच्या भूगर्भातील पाणी पातळी खालावली असल्याने गावागावातील नागरिकांनी राजकीय मतभेद विसरून गाव पाणीदार बनविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करायला पहिजे. गावामध्ये जास्तीत जास्त प्रमाणत श्रमदान करून लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करणे काळाची गरज असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

पाण्याचे गांभीर्य ओळखा - अनुराधा चव्हाण
गेल्या चार-पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे जमिनीच्या भूगर्भातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे गांभीर्य ओळखून गावागावात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करणे काळाची गरज असल्याचे शांती प्रतीष्ठाच्या  अध्यक्षा अनुराधा चव्हाण यांनी सांगितले. तसेच शहरी भागातून अनेक संस्था जलसंधारणाचे कामे करीत आहे. याच धर्तीवर शांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा तालुक्यात अनेक ठिकाणी जलसंधारणाचे काम करण्यात येत आहे.

Web Title: water cup in Phulambri