बार्शीवर जलसंकट

प्रशांत काळे
मंगळवार, 18 जून 2019

तांत्रिक अडचणींमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या तब्बल १२ ते १३ दिवसांनंतर शहरवासीयांना नगरपालिका पाणीपुरवठा करत आहे. नळाला पाणी कधी येणार, असा प्रश्‍न महिलांना सतावत आहे. उजनी धरणाची पातळी पूर्णपणे खालावली असून, १५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याचे अधिकारी सांगत आहेत. यामुळे बार्शी शहरावर जलसंकट उभे ठाकले आहे.

बार्शी - तांत्रिक अडचणींमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या तब्बल १२ ते १३ दिवसांनंतर शहरवासीयांना नगरपालिका पाणीपुरवठा करत आहे. नळाला पाणी कधी येणार, असा प्रश्‍न महिलांना सतावत आहे. उजनी धरणाची पातळी पूर्णपणे खालावली असून, १५ दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक असल्याचे अधिकारी सांगत आहेत. यामुळे बार्शी शहरावर जलसंकट उभे ठाकले आहे. 

सध्या कंदर येथील पंपहाउसमधून चारी खोदून साडेबारा अश्‍वशक्तीचे १२ पंप बसवून चारीत पाणी सोडून पाणी उपसा केला जात आहे. धरणातील पाणीस्रोत बदलेल तसे पाइप पुढे सरकावे लागत आहेत. सुमारे दीड लाख लोकसंख्येसाठी सरासरी दोन कोटी ५० लाख लिटर पाण्याची गरज असून, स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असतानाही अवघा ८० लाख लिटर पाणी उपसा होत आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक संकटात गेल्याचे दिसत आहे. 

शहरातील हातपंप, विहिरी आदी सर्व स्रोत बंद पडले असून, भविष्यात उजनीचा पाणीपुरवठा बंद पडला तर लातूरप्रमाणे शासनास बार्शीला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येईल, अशी शक्‍यताही व्यक्त केली जाते.

२ कोटी ५० लाख लिटर शहराची पाण्याची गरज
८० लाख लिटर सध्याचा पाणी उपसा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Disaster on Barshi Ujani Dam Water Lavel Decrease