esakal | परभणीत जुन्या जलवाहिण्यांवरील पाणी वितरण होणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी महापालिका गेल्या डिसेंबर-जानेवारी महिण्यापासून नवीन वितरण व्यवस्थेवर नळ जोडण्या देण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आयुक्त देविदास पवार यांनी हा प्रश्न निकाली काढला. नळजोडणीसाठी शिबिरे घेतली. पालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवकदेखील आपल्या प्रभागात नळजोडण्यांसाठी प्रयत्नशिल आहेत. परंतू, अपेक्षित गती प्राप्त झाली नाही. त्यामुळे आता ज्या भागात अधिकाधिक नव्या नळजोडण्या दिल्या आहेत, त्याभागातील जुन्या जलवाहिण्यावरील पाणी वितरण बंद करणे सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परभणीत जुन्या जलवाहिण्यांवरील पाणी वितरण होणार बंद

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः महापालिकेच्या नळजोडणी प्रक्रियेला सर्व सोयी, सवलती देऊनही अपेक्षीत गती मिळत नाही. त्यामुळे की काय पालिकेने आता ज्या भागात अधिकाधिक नव्या नळजोडण्या दिल्या आहेत, त्याभागातील जुन्या जलवाहिण्यावरील पाणी वितरण बंद करणे सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिका गेल्या डिसेंबर-जानेवारी महिण्यापासून नवीन वितरण व्यवस्थेवर नळ जोडण्या देण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आयुक्त देविदास पवार यांनी हा प्रश्न निकाली काढला. नळजोडणीसाठी शिबिरे घेतली. पालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवकदेखील आपल्या प्रभागात नळजोडण्यांसाठी प्रयत्नशिल आहेत. परंतू, अपेक्षित गती प्राप्त झाली नाही.

हेही वाचाहे रंग तुम्हाला भुरळ घालताहेत...तर सावधान...!

दहा हजाराचा टप्पा गाठण्यासही नाकीनऊ

शहरात ७५ हजार मालमत्ता असून किमान ५० हजार नळजोडण्यांचे महापालिकेने उद्दीष्ट ठेवले आहे. परंतू, दहा हजारांचा टप्पा गाठण्यासाठी पालिकेच्या नाकीनऊ आले आहेत. ज्या भागात नळ नाहीत तेथेच नळ जोडण्या होत असून जिथे जुने नळ आहेत, तेथील  नागरिकांनी नळजोडणी घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रभाग समिती ‘ब’ अंतर्गत सर्वाधिक नविन नळ जोडण्या झालेल्या आहेत. आलेले चार हजार ५४ अर्ज निकाली काढण्यात आले असून सर्व नळ कनेक्शन देण्यात आले. प्रभाग समिती ‘अ’ मध्ये तीन हजार १०० अर्ज आले असून दोन हजार १०० नळजोडण्यांची कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. तर प्रभाग समिती ‘क’ मध्ये केवळ दोन हजार १७ मागणी अर्ज आले. त्यापैकी एक हजार ७२० नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

येथे क्लिक करामुक्रमाबाद धान्य घोटाळा : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष -

जुन्या नळजोडण्या बंद करण्यास सुरुवात

ज्या भागात मोठ्या संख्येने नवीन नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्या भागांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली जात आहे. त्याच बरोबर त्या भागातील जुन्या पाणी वितरण व्यवस्थेवरील पाणी वितरण बंद करण्यास सुरुवात झाली आहे. जुन्या वितरण व्यवस्थेवरील वसाहतींना दहा एवजी २० दिवसाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही वसाहतींचा हळूहळू बंद केला जात आहे. लवकरच याबाबत महापालिका नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करणार असून जुनी वितरण व्यवस्था बंद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


संपादन ः राजन मंगरुळकर

loading image
go to top