पाणी फाउंडेशन व्हावी लोकचळवळ - आमीर खान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

औरंगाबाद - ‘‘पाण्यावर काम करणाऱ्या विविध संस्थांपैकी पाणी फाउंडेशन ही एक असून, पाण्याची सर्वांगीण गरज लक्षात घेता पाणी फाउंडेशन ही लोकचळवळ व्हावी,’’ अशी अपेक्षा अभिनेता आमीर खान यांनी व्यक्त केली. एक मे रोजी राज्यात पाच लाखांवर व्यक्तींनी शंभर गावांत श्रमदानात सहभाग नोंदविला. त्याबाबतचे निरीक्षण आमीर खान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडले. 

औरंगाबाद - ‘‘पाण्यावर काम करणाऱ्या विविध संस्थांपैकी पाणी फाउंडेशन ही एक असून, पाण्याची सर्वांगीण गरज लक्षात घेता पाणी फाउंडेशन ही लोकचळवळ व्हावी,’’ अशी अपेक्षा अभिनेता आमीर खान यांनी व्यक्त केली. एक मे रोजी राज्यात पाच लाखांवर व्यक्तींनी शंभर गावांत श्रमदानात सहभाग नोंदविला. त्याबाबतचे निरीक्षण आमीर खान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडले. 

श्रमदानामुळे शहरवासीयांची ग्रामीण भागाशी नाळ जुळली. यातून जलसंधारणाच्या कामात अपेक्षित यश मिळत असल्याचेही आमीर यांनी सांगितले. पाणी फाउंडेशनच्या निर्मितीची माहिती देत शहरवासीयांनी रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, तर ग्रामीण भागात वॉटर शेडची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

दगड पास करायला आवडते - राव
‘‘श्रमदानात खोदकाम अवघड असते; मी दोन दिवस कंपार्टमेंट बंडिंगचे काम केले. यात मला दगड पास करायला आवडते,’’ असे किरण राव म्हणाल्या. सहा वर्षांच्या चिमुकलीचे श्रमदान पाहून बळ मिळाल्याचे त्या म्हणाल्या. गतवर्षी खापरटोण (जि. बीड) येथे केलेल्या कामामुळे आजघडीला भर उन्हाळ्यात तेथील विहिरी तुडुंब असल्याचे सत्यजित भटकळ त्यांनी सांगितले.

कामे न झालेली गावे दत्तक घेणार
पालखेड (ता. वैजापूर) - वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान करणाऱ्या वैजापूर तालुक्‍यातील कोल्ही आणि सावखेडगंगा येथे आमीर व किरण राव यांनी भेट दिली. स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर लोकसहभागाची चळवळ प्रभावीपणे राबविण्यास पुढाकार घेणाऱ्या प्रमुखांच्या आमीर खान यांनी घेतलेल्या मुलाखतींचे चित्रीकरण करण्यात आले. जलसंधारण, पाणलोट, पाणी बचत तसेच सिंचनाची कामे करण्यासाठी हे स्पर्धात्मक अभियान आहे. यात कोल्ही, सावखेडगंगा गावांनी सहभाग नोंदविला. कोल्ही येथे प्रा. सुधाकर पवार, सावखेडगंगा येथे सहशिक्षक भारत दांडगे यांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली. कोल्हीपासून एक किलोमीटर अंतरावर सकाळी हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन झाले. या वेळी पोलिस बंदोबस्त होता. महिलांनी आमीर, किरण राव यांचे स्वागत केले. या वेळी आमीर यांनी वैजापूर तालुक्‍यातील ७६ गावांत झालेली कामे व श्रमदानाचा आढावा घेतला. पावसाळ्यात बहुतांश गावे ओलिताखाली येतील. कामे झाली नाहीत, अशी गावे दत्तक घेऊन शिवार जलयुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Water Foundation Movement of people aamir khan