गोदावरीत नदीला पाणी; शेतशिवार मात्र कोरडे

बाळासाहेब लोणे
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पावसाने गोदावरी नदीच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने पानी झेपावत आहे मात्र, दुष्काळी तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदीला पाणी असले तरीही तालुक्यातील शेतशीवर तहानलेलेच आहे. मंगळवारी (ता. 28) अखेर 888 क्विसेकने पाण्याची आवक सुरू होती. यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आगामी महिनाभरात परतीच्या पावसाने जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

गंगापूर : नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील पावसाने गोदावरी नदीच्या माध्यमातून जायकवाडीच्या दिशेने पानी झेपावत आहे मात्र, दुष्काळी तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदीला पाणी असले तरीही तालुक्यातील शेतशीवर तहानलेलेच आहे. मंगळवारी (ता. 28) अखेर 888 क्विसेकने पाण्याची आवक सुरू होती. यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आगामी महिनाभरात परतीच्या पावसाने जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरणार आहे.

तालुक्यातील गोदावरी पाणी पट्टा सोडला तर संपूर्ण तालुका तहानलेलाच आहे. काही अंशी नांदूर मधमेश्वरच्या कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याने शेतकरी सुखावला असला तरीही तालुक्यातील लासुरस्टेशन, तांदूळवाडी, कनकोरी, सिद्धनाथवाडगाव, डोणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 

जूनच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या. तुरळक पावसावर काही भागात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, भूईमूग, कपाशीची पेरणी झाली. मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. पिकांना आवश्यक असणारा दुसरा पाऊस जुलैच्या मध्यावर न झाल्याने पिके सुकली. ऑगस्ट उजाडला तरी पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली. थेट ऑगस्टच्या मध्यात दोन दिवस झालेल्या भीज पावसावर पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. पावसाचे सुरूवातीचे अडीच महिने कोरडे गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गावोगावचे पाझर तलाव कोरडे पडत आहेत. 

गंगापूर तालुक्यातील पावसाचा अहवाल
वार्षिक सरासरी (625), अपेक्षित सरासरी (371), मागील वर्षी आजवर पडलेला पाऊस (308), चालू वर्षीचा पाऊस (365), मागील वर्षीचा आजचा पाऊस (8), यंदाचा आजचा पाऊस (0), चालू वर्षाची आजवरची टक्केवारी (71), वार्षिक टक्केवारी (42.45)  

तालुक्यात सिंचन व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला असून, दुष्काळी तालुक्यातून वाहणारी गोदावरी पुढील अनेक जिल्हे समृद्ध करते, मात्र. गंगापूर तालुक्यातील काही भागालाच या नदीचा उपयोग होतो. गोदावरी ते शिल्लेगाव धरण या नव्या पाणी योजनेला मान्यता दिल्यास शेकडो गावे टंचाईमुक्त होतील.  - विजय मनाळ (नेते, काँग्रेस)

Web Title: Water on the Godavari river