गोदेला पाणी आल्याने ग्रामस्थ खूश 

गुंज बुद्रुक परिसरातील गोदावरी नदीपात्र. 
गुंज बुद्रुक परिसरातील गोदावरी नदीपात्र. 

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) - जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे महिनाभरानंतर गुंज बुद्रुक परिसरातील गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. या पाण्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्‍न मिटला आहे. यामुळे ग्रामस्थ सध्या खूश आहेत. 

ऑगस्ट महिन्यात 15 तारखेला गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले होते; मात्र आलेले पाणी तसेच खालच्या पात्रात गेले, नदीतील वाळू उपशामुळे झालेले खड्डे, डोह मात्र भरलेले होते, पाणी कमी होताच पुन्हा महिनाभरानंतर जायकवाडीचे धरणातून पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. यामुळे राजाटाकळी, शिवणगाव बंधाऱ्यासह उक्कडगाव, शिवणगाव, भादली, सिरसवाडी, गुंज, काळुंकावस्ती (ता.घनसावंगी), हिवरा, डुब्बाथडी, काळेगाव, कवडगाव (ता.माजलगाव) पात्रात पाणी पोचले आणि पात्र दुथडी भरून वाहू लागले. यामुळे गावकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

या गावातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चारा-पाण्याचा व सिंचनाचा मोठा प्रश्‍न मिटला आहे. 

शिवणगाव बंधाऱ्याचे दरवाजे बंद केल्यानंतर उक्कडगाव, भादली, सिरसवाडी, गुंज, काळुंकावस्ती, हिवरा, डुब्बाथडी, काळेगाव, कवडगाव या गावांतील लोकांना पिण्यासाठी, जनावरांसाठी पाणी मिळणेही अवघड होते; मात्र बंधाऱ्यात जास्त पाणी झाल्यास सरळ पात्रात पाणी सोडल्या जाते. दुष्काळात मात्र आंदोलन करूनही उपयोग होत नाही यासाठी गुंजच्या गोदावरी पात्रात छोटा बंधारा असणे अत्यंत गरजेचे आहे. 
ज्ञानदेव कचरे 
माजी सरपंच, गुंज 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com