जालना जिल्ह्यातील कोरड्या गोदेला येतेय पाणी 

बळेगाव (ता. अंबड) : गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी दाखल झालेले पाणी.
बळेगाव (ता. अंबड) : गोदावरी नदीपात्रात शुक्रवारी दाखल झालेले पाणी.

शहागड/अंकुशनगर - भर पावसाळ्यात कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीला आता जलमय स्वरूप आले आहे. पैठणच्या नाथसागरातून सोडण्यात आलेले पाणी जिल्ह्यातील बळेगाव परिसरातील गोदापात्रात शुक्रवारी (ता. 16) सायंकाळी दाखल झाले. 

नाशिक तसेच नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात यंदा चांगला पाणीसाठा झाला. मात्र, पावसाने पाठ फिरविलेली असल्याने जालना जिल्ह्यातील गोदापात्र मात्र कोरडेच होते. पाण्याबाबत अजूनही दुष्काळसदृश स्थिती आहे. अशा परिस्थितीत पैठणच्या धरणातून गोदापात्रात सोडले जाणारे पाणी दिलासा देणारे आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील बळेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी धरणातून सोडलेले पाणी पोचले आहे. 

प्रशासन झाले सज्ज 
गोदावरी पात्रात पाणी आल्याने अंबडचे महसूल व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. महसूल विभागाने मंडळ अधिकाऱ्यांचे चार पथक नेमले आहे. गोदाकाठच्या सर्व गावांमध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, धार्मिक स्थळावरूनही ध्वनिक्षेपकाद्वारे संदेश देण्यात आला. त्यात नदीपात्रात कोणीही जाऊ नये, जनावरे, वाहने पात्रात घेऊन जाऊ नयेत, याबाबत सर्वांना अवगत करण्यात आले आहे. अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांनी गोदापात्राला भेट देत पाहणी केली. तहसीलदार मेने या गोदाकाठी महसूल कर्मचाऱ्यांसह तळ ठोकून आहेत. 

पाणी पाहण्यासाठी गर्दी 
तब्बल दोन वर्षांनंतर गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी पाणी पाहण्यासाठी गोदाकाठावर मोठी गर्दी केली. गोदावरी पात्रात पाणी आल्याने जवळपासच्या गावातील ग्रामस्थ व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com