धरणापेक्षा बॅरेजेसमध्ये पाणी जास्त

लातूर ः मांजरा पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने नदीच्या पात्रात पाणी आले. येथील छायाचित्रकार श्‍याम भट्टड यांनी ड्रोनच्या साहाय्याने टिपलेले नागझरी बॅरेजेसमध्ये साठलेल्या पाण्याचे विहंगम दृश्‍य.
लातूर ः मांजरा पट्ट्यात दमदार पाऊस झाल्याने नदीच्या पात्रात पाणी आले. येथील छायाचित्रकार श्‍याम भट्टड यांनी ड्रोनच्या साहाय्याने टिपलेले नागझरी बॅरेजेसमध्ये साठलेल्या पाण्याचे विहंगम दृश्‍य.

लातूर ः लातूर शहराला पुन्हा एकदा हजारो टॅंकर आणि रेल्वेने पाणी द्यावे लागते की काय अशी परिस्थिती असताना गेल्या तीन-चार दिवसांत पडलेल्या परतीच्या पावसामुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणात पाणी आले. मांजरा नदी पहिल्यांदाच भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मांजरा धरणाच्या मृतसाठ्यात 15 दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे.

तर मांजरा नदीच्या शंभर किलोमीटर पात्रातील सर्व बॅरेजेसमध्ये 24.58 दशलक्षघनमीटर पाणी थांबले आहे. याचा मोठा फायदा पिण्याचे पाणी, सिंचन, विहिरी, बोअरला होणार आहे. 
यावर्षी पावसाने चांगलीच पाठ फिरवली होती. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात चार दशलक्षघनमीटर पाणी राहिले होते. सध्या शहरात पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. नळाद्वारे पाणीपुरवठा बंद केला जाणार होता.

वर्ष 2015 पेक्षा जास्त हाल यावर्षी होतील अशी भीती होती. हजारो टॅंकर लावण्याचे नियोजनही केले जात होते; पण यात गेल्या चार दिवसांत परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावत लातूरकराची चिंता दूर केली. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील मृतसाठ्यात 15 दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला. ही लातूरसह अंबाजोगाई, कळंब, केज अशा शहरासाठी ही दिलासा देणारी बाब ठरली. 


मांजरा नदीच्या पट्ट्यातही मोठा पाऊस झाला. रात्रीतून तांदुळजा महसूल मंडळात 170 तर चिंचोली मंडळात 112 मिलिमीटर पाऊस झाला. इतर मंडळांतही 50 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. याचा परिणाम मांजरा नदीला पाणी आले. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीवरील बॅरेजेसचे दरवाजे उघडून ते पाणी पात्रात सोडावे लागले. यात नदीच्या शंभर किलोमीटर अंतरावरील दहा बॅरेजेसपैकी चार ते पाच बॅरेजेस शंभर टक्के भरले. या सर्व बॅरेजेसमध्ये आता 24.58 दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे. याचा मोठा फायदा पिण्याचे पाणी, सिंचन, तसेच विहिरीची पाणीपातळी वाढण्यास होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com