अबब...चक्क पोलिस ठाणे पाण्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बीड शहर पाणीमय झाले. चक्क शिवाजी नगर ठाण्यातच पाणी घुसले. 
 

बीड : सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे बीड शहर पाणीमय झाले. चक्क शिवाजी नगर ठाण्यातच पाणी घुसले. 

शहर आणि परिसरात प्रथमच सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. दोन तास झालेल्या पावसाने शहरात सर्वत्र पाणी झाले. नाल्या तुंबल्याने रस्त्यावर पाणी येऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले.

दरम्यान, जोरदार पाण्याचा लोंढा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घुसल्याने ठाणेही जलमय झाले. पाणी विद्यात उपकरनंजवळ गेल्याने वीज पुरवठा खंडित करावा लागला. ठाण्यातील साहित्याची आवरा आवर करताना पोलिस कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water infiltrated Beed police station