खोल खोल पाणी

राजेभाऊ मोगल
बुधवार, 9 मे 2018

मराठवाड्यातील ३९ तालुक्‍यांत भूजल पातळीत घट
औरंगाबाद - पर्जन्यमानात झालेली घट, पावसाचे वाहून जाणारे आणि भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा यामुळे पाणीपातळी वेगाने घटत आहे. यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील पूर्ण ३९ तालुक्‍यांत पाणीपातळीत १ ते ३ मीटरहून अधिक प्रमाणात घट झाली असून, उर्वरित परभणी जिल्ह्यातील ९ पैकी ८, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सर्व अशा ३७ तालुक्‍यांत मात्र पातळी वाढल्याचे दिलासादायी चित्र आहे.

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक पाणी घट ही औरंगाबाद जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

एखादा प्रकल्प, उपक्रम किंवा सोहळा यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला, असे उदाहरण एकेकाळी दिले जायचे. मात्र, आज चित्र बदलले आहे. मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करूनही आवश्‍यक तेवढे पाणी मिळेल की नाही, याची शाश्‍वती आज राहिलेली नाही. केवळ पाण्याची काळजी घेतली नसल्यामुळेच हे दिवस आपल्याला पाहण्याची वेळ आल्याचे आता विविध कार्यक्रमांतून सांगितले जात आहे. वेळीच उपाययोजना व्हायला हव्यात, अन्यथा फार वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे तिसरे युद्ध पाण्यासाठी होईल, हे भाकित खरे ठरेल, अशी भीती जलतज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात प्रमाण जास्त 
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत वगळता औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, सोयगाव, वैजापूर, गंगापूर या सर्वच तालुक्‍यांतील पाणीपातळी ३ मीटरहून अधिक घटली आहे.

पाच वर्षांच्या तुलनेत सध्या पाणीपातळीतील झालेली घट (मीटरमध्ये)
औरंगाबाद -     ५.०३
जालना -     ०.६८
परभणी -     १.६१
हिंगोली -     १.८३
नांदेड -     १.३१
लातूर -     २.५६
उस्मानाबाद -     ३.३५

सद्य:स्थितीतील घट (मीटरमध्ये)
औरंगाबाद -     १३.६९
जालना -     १०.१९
परभणी -     ८.८९
हिंगोली -     १०.५९
नांदेड -    ९.६६
लातूर -     ७.०५
उस्मानाबाद -     ६.२६

Web Title: water issue