पाणीप्रश्‍नी अधिकाऱ्यांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

औरंगाबाद - सिडको-हडको भागात तब्बल सहा दिवसांपासून पाणी नसताना अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. नऊ) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

औरंगाबाद - सिडको-हडको भागात तब्बल सहा दिवसांपासून पाणी नसताना अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सोमवारी (ता. नऊ) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

गेल्या दोन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. पाच-सहा दिवसांनंतरही पाणी मिळत असून, तेही अवेळी येत असल्याने संतप्त नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. त्यामुळे सिडको-हडको भागातील नगरसेवक सकाळीच एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर जमा झाले. या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्यामुळे सकाळी नऊ वाजेपासून आंदोलन सुरू करण्यात आले. १७ वॉर्डांत पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी सर्वांत आधी भरून एकसमान पाणीपुरवठा करायला हवा,

अशी मागणी भाजप गटनेता 
प्रमोद राठोड यांनी केली. नक्षत्रवाडी येथून १३५ एमएलडी पाणी येते. त्यापैकी आठ एमएलडी पाणी एन-पाच येथील टाकीला मिळायला हवे; मात्र सध्या केवळ १.३ एमएलडी पाणी येत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे, ही पाणीटंचाई कृत्रिम असून, पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झाल्याचे नगरसेविका माधुरी अदवंत यांनी स्पष्ट केले. उपमहापौर विजय औताडे, नगरसेविका माधुरी अदवंत, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, प्रभाग सभापती मनोज गांगवे, सोहेल शेख, कमलाकर जगताप, भगवान घडमोडे यांच्यासह सुनील नाडे, दामुअण्णा शिंदे, बालाजी मुंढे यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व एकसमान पाणीवाटपाची मागणी केली. याबाबत माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त नवलकिशोर राम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चहेल हेदेखील एन- पाच येथे गेले. या वेळी चहेल यांना घेराव घालण्यात आला. महापौरांसह आयुक्तांनी पाण्यावर तातडीने बैठक घेऊ, असे आश्‍वासन दिल्यानंतर नगरसेवकांनी माघार घेतली.

Web Title: water issue agitation