जालना : सिडको प्रकल्पाला पाणी देण्यावरुन गोंधळ

उमेश वाघमारे
गुरुवार, 17 मे 2018

दरम्यान 48 एमएलडी पाणी जायकवाडी धारणातुन उचलले जात आहेत. त्यातील जालना शहरात 42 एमएलडी पाणी गरजेचे आहे. तर चार एमएलडी पानी हे अंबड शहराला पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे सिडकोला नगरपालिका पाणी देणार की नाही याच उत्तर स्पष्ट झालेले नाही.

जालना : शहरात नव्याने होऊ घेतलेला सिडको प्रकल्पास जालना नागरपालिकेने शहराची तहान भागवून पाणी द्यावे, असा आग्रह उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह सर्व नगरसेवकांनी लावून धरला.

गुरुवारी (ता.17) जालना नगरपालिकेची सर्व साधारण सभेत सिडको प्रकल्पाला 27 एमएलडी पाणी देण्याचा विषय विषय पत्रिकेत ठेवण्यात आला होता. त्यावर सर्वच नगरसेवकांनी  जालना शहराची तहान पूर्ण भागल्यानंतर उरलेले पाणी सिडकोला द्यावे अशी मागणी केली.

दरम्यान 48 एमएलडी पाणी जायकवाडी धारणातुन उचलले जात आहेत. त्यातील जालना शहरात 42 एमएलडी पाणी गरजेचे आहे. तर चार एमएलडी पानी हे अंबड शहराला पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे सिडकोला नगरपालिका पाणी देणार की नाही याच उत्तर स्पष्ट झालेले नाही.
 
Web Title: water issue in Jalna

टॅग्स