जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवसात 

Jayakwadi Dam
Jayakwadi Dam

औरंगाबाद : जायकवाडी धरणात निर्माण झालेली 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी सोडण्याबाबत येत्या चार दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. पी. कोहीरकर यांनी सांगीतले. 65 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणी असल्याच्या सूत्रानुसार ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून पाणी सोडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

याबाबत सोमवारी (ता. 15) गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक, नगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांकडून एकूण पाणीसाठा, त्याचा खरीपासाठी झालेला वापर आणि सध्याचा उपयुक्‍त जलसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर पाणी सोडण्याचा चार दिवसात निर्णय घेण्याचे जाहीर केले. यावेळी जायकवाडीत 172 दलघमी पाण्याची तूट असल्याचे समोर आले. ऊर्ध्व भागातील प्रकल्पातील पाणीसाठ्यातून ही तूट भरून काढण्यासाठी काय करता येईल, याविषयी येत्या तीन ते चार दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्री. कोहिरकर यांनी सांगीतले. 

ऊर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा, पालखेड समूहासह जायकवाडीमधून खरीपासह किती पाण्याचा वापर करण्यात आला. तसेच सद्य:स्थितीत उपयुक्‍त पाणीसाठ्याचा आढावा घेतला. मुख्य अभियंता दि. द. तवार, संजय भर्गोदेव, अ. रा. नाईक, नाशिक येथील मुख्य अभियंता कि. भा. कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे, नगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, पालखेडा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट आदी उपस्थित होते. 

ठरलेल्या सूत्रानुसार... 
यापूर्वी 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तर 2014 आणि 2015 मध्ये न्यायालयाच्या आदेशाने पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पडली होती. एकवेळा 10.40 टीएमसी तर एकवेळ 7.10 टीएमसी पाणी ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून सोडले होते. जायकवाडीत 65 टक्‍क्‍यांपेक्षा पाणी कमी असल्यास ठरलेल्या सूत्रानुसार आता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

ऊर्ध्व भागातील प्रकल्पातील पाणी वापर व सद्य:स्थिती (द.ल.घ.मी.) 
प्रकल्प - एकूण साठा - वापर - सद्यस्थिती 
मुळा समूह - 594 - 189 - 405 
प्रवरा - 602 - 96 - 506 
गंगापूर - 314 - 68 - 246 
गोदावरी दारणा - 774 - 165 - 609 
ऊर्ध्व गोदावरी - 398 - 100 - 298 
जायकवाडी - 1236 - 441 - 795

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com