मांजरा धरणातून डाव्या, उजव्या कालव्यात पाणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

लातूर - सतत दोन वर्षे मांजरा धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरले होते. त्यामुळे पिण्याच्या पाणी पुरवठ्यासोबतच धरणातून सिंचनासाठीही पाणी सोडले जात आहे. रविवारी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलेआहे. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांना पाणी देता येणार आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून मांजरा धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन्ही वर्ष हे धरण पाण्याने शंभर टक्के भरून वाहिले. त्यामुळे टंचाई भासली नाही. पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली आहे. या धरणाच्या पाण्यावर सिंचनाचे क्षेत्रही मोठे आहे. या धरणाचा उजवा कालवा धरणापासून 72 किलोमीटर लांबीचा आहे; तर डावा कालवा हा 90 किलोमीटर लांबीचा आहे. या दोन्ही कालव्यांच्या कार्यक्षेत्रात सिंचनाचे क्षेत्र मोठे आहे. त्यात अनेक शेतकरी उन्हाळी पिके घेत आहेत. यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. दररोज 40 अंशावर तापमान राहत आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या विहिरी, विंधन विहिरीतील पाण्यावर होत आहे. पिके सुकून जात आहेत. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत होती. आतापर्यंत पाटबंधारे विभागाने धरणातून दोनदा सिंचनासाठी पाणी सोडले आहे. रविवारी तिसऱ्यांदा डाव्या व उजव्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उन्हाळी पिकांना पाणी देण्याची सोय झाली आहे. 

Web Title: Water from left of Manjra Dam