esakal | मांजरा धरणातील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

manjara dam

केज, (जि. बीड)  : मराठवाड्यातील बीड, लातूर व उस्मानाबाद शहरांसह जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून केज तालुक्‍यात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस होत आहे. 

मांजरा धरणातील पाणीसाठ्यात अद्यापही वाढ नाही 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केज, (जि. बीड)  : मराठवाड्यातील बीड, लातूर व उस्मानाबाद शहरांसह जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाच्या पाणीपातळीत अद्यापही वाढ झाली नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून केज तालुक्‍यात दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस होत आहे. 

यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, तर लातूर, कळंब, केज, धारूर व अंबाजोगाई या शहरांसह ग्रामीण भागातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्‍यता आहे. त्याबरोबर या भागातील उसाचे क्षेत्रही कमी होणार आहे. 
धरण भरण्यासाठी पावसाचा जोर असाच काही दिवस सुरू राहिल्यास धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ सुरू होईल, अशी आशा धरणाचे शाखा अभियंता एस. डी. पाटील यांनी व्यक्त केली. 

धनेगाव येथील मांजरा धरण दोन वर्षांपूर्वी परतीच्या जोरदार पावसाने पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर मागील वर्षी पाऊस न झाल्याने धरणात पाणीसाठा झाला नव्हता. यावर्षीही अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात ढग दाटून येत आहेत; मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस पडत आहे. 
गेल्या अनेक महिन्यांपासून या विभागात पाऊस नसल्यामुळे सध्या दोन-तीन दिवसांत अल्प प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणी जमिनीतच मुरले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत मांजरा धरणाकडे नदी-नाल्यांतून पाणी येण्यास सुरवात झाली नसल्याचे एस. डी. पाटील यांनी सांगितले.  

loading image
go to top