पाऊसामुळे वेताळवाडी धरणातील पाणीपातळी वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

जरंडी : बनोटी मंडळात झालेल्या दमदार पाऊस आणि अजिंठा डोंगर रांगासह सिल्लोड तालुक्यात झालेल्या पाऊसाने सोयगावच्या वेताळवाडी आणि बनोटीच्या धरणातील पाणीपातळी पाच ते सात फुटांनी वाढली आहे. दरम्यान तालुक्यात दोनच धरणातील पाणीपातळी वाढल्याने उर्वरित तेरा धरणे अद्यापही तहानलेलीच आहे. दरम्यान वेताळवाडी धरणात अजिंठा डोंगर रांगांच्या पाण्याची आवक वाढल्याने धरणात नवीन पाण्याचा साठा जमा झाला आहे.

सोयगाव पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असलेल्या सोयगाव आणि बनोटी या दोन शाखेतील पंधरा धरणांपैकी वेताळवाडी आणि बनोटी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. उर्वरित धरणे अद्यापही मोठ्या पाऊसाच्या प्रतीक्षेत असल्याने तालुक्यातील वेताळवाडी आणि बनोटी धरणाचे सोंदर्य नवीन पाण्याने खुलले आहे. पाण्याची आवक आणि वातावरण बदलाने वेताळवाडी धरणात पाहुण्या पक्षांचे आगमन होण्याची चाहूल निर्माण झाली असून, प्रारंभी घरट्यात मुक्काम ठोकलेल्या विविध प्रजातीच्या पक्षांचा धरण भागात किलबिलाट वाढला आहे. सोयगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि सोयगावसह पाच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या द्वेतलवाडी धरणाची पाणीपातळी मागील आठवड्यात चिंताजनक झाली होती. प्रांती डोंगर रांगांतील सततच्या पाऊसाने आणि सिल्लोड तालुक्यात झालेल्या दमदार पाऊसामुळे या धरणाच्या पाण्याची आवक वाढली आहे.

धबधब्यांना फुटला पाझर   
अजिंठा डोंगरात असलेल्या डोंगराच्या कपारीतील व दरीवरील धबधब्यांना पाझर फुटल्याने कोरडेठाक झालेले धबधबे वाहते झाले असल्याने अजिंठा डोंगराचे सोंदर्य खुलले असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सोयगावसह तालुक्यात पाऊसाचे आगमन झाले आहे. अजिंठा डोंगरात सततच्या पडणाऱ्या पावसाने धरणाच्या पाण्याची आवक मोठी होत असतांना या धरणाच्या संरक्षण भिंतीची व पिचिंगची मोठी दुरवस्था झाली आहे. पाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Water level in the Vetalwadi dam due to rain increased