पाचशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी दुरुस्तीला सुरुवात

योगेश पायघन
शनिवार, 16 जून 2018

-घाटीसह बेगमपुरा पहाडिंगपुरा 
परिसरातील सहा कॉलनी मध्ये आज निर्जळी
-संध्याकाळ पर्यंत दुरुस्तीची झाली 
तरच उद्या पाणीपुरवठा
-महापालिकेकडून सामानाची जुळवाजुळव 
-पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी गेले वाया
-कर्मचाऱ्यांच्या घरात घुसले पाणी

औरंगाबाद : घाटीत सुपरस्पेशालिटी विंग इमारतीचे बांधकाम सुरू असताना महापालिकेची बेगमपुरा पहाडसिंगपुरा भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शुक्रवारी (ता.15) मध्यरात्री फुटली. त्यामुळे बेगमपुरा पानचक्की घाटी परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून लक्ष्मी कॉलनी, गुरू गणेश नगर, विद्युत कॉलनी, हनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा बेगमपुऱ्यातील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला आहे. 

शनिवारी सकाळी अकरा वाजता वैद्यकिय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व पाणीपुरवठा  कर्मचाऱ्यांना बोलावून पाईपलाईनची पाहणी केली. तसेच, घाटीतील संपवेलमध्ये पर्यायी पाण्याची व्यवस्था केली. महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीच्या सामुग्रीची जमवाजमव दुपारी दोन वाजेपर्यंत करत होते. रात्री जेसीबीने ड्रेनेज लाईनसाठी चारी खोदली जात होती. त्यावेळी, इमारतीच्या कोऱ्यावर काटकोनातील पाईपलाईनवर असलेला सिमेंटचा थर जेसीबीने उखडल्याने बेंडचा जॉईंट तुटल्याने पाईप लाईन फुटली. इमारतीच्या कंत्राटदाराने जॉईंट पुन्हा लावण्याचा प्रयन्त केला आहे मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. या जॉइन्टवर पुन्हा नव्याने सिमेंटचे फाउंडेशन करावे लागणार आहे. असे महापालीकेचे मुख्य आरेखक म्हेत्रे व मुख्य लाईनमन बबन सरवदे यांनी सांगितले.

Web Title: The water pipeline repairing are start