जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांत वॉटर प्युरिफायर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

लातूर - लातूर जिल्ह्यातील पाण्याचा हार्डनेस पाहता मुलांना किडनीचा आजार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यांना शुद्ध पाणी मिळावे या करिता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांत वॉटर प्युरिफायर देण्यात येणार आहे. 

या योजनेचा प्रारंभ किल्लारी येथील शाळेला वॉटर प्युरिफायर देवून करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी मंगळवारी (ता. 26) येथे पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या करिता औशातील किल्ल्यात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन घेण्यात आले. खरेदी विक्री संघाच्या वतीने तेथे दोन हजार शेतकऱ्यांना पंप व कीटकनाशक माफक दरात वाटप करण्यात आले. येथील मातोश्री वृद्धाश्रमात असलेल्या आजी आजोबांना गादी, चादर, पांघरूनाचे वाटप करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी पाइपलाइनची दुरुस्तीही करून देण्यात आली. ता. 29 जुलै रोजी जिल्हा परिषद शाळांत एक हजार डझन वह्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच याच दिवशी नेत्रचिकित्सा शिबिर घेतले जाणार आहे. गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती श्री. सावंत यांनी दिली. 

जिल्ह्यात पाण्याचा हार्डनेस जास्त आहे. त्यामुळे किडनीचे आजार होण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊन मुलांना चांगले पाणी मिळावे या करिता जिल्हा परिषदेच्या शंभर शाळेत वॉटर प्युरिफायर देण्यात येणार आहेत. पक्षातर्फे सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात जास्ती जास्त सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. या वेळी सहसंपर्क प्रमुख ऍड. बळवंत जाधव, अभय साळुंके, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नगरसेवक रवी सुडे, माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे आदी उपस्थित होते. 

महापालिकेत गैरव्यवहार 

महापालिकेत झालेल्या एका गैरव्यवहार प्रकरणातील सर्व कागदपत्र हाती आली आहेत. त्याचा अभ्यास सुरू आहे. ता. 29 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन हा गैरव्यवहार उघड केला जाईल अशी माहिती श्री. सावंत यांनी दिली.

Web Title: Water purification hundred schools of the District Council