जायकवाडीचे चार दरवाजे उघडले; अखेर गोदावरीत विसर्ग

राजेभाऊ मोगल/ डॉ. माधव सावरगावे
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

पाणी विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करु नये,नदी क्षेत्रात विहार करु नये अथवा जनावरांना मोकळे सोडु नये. नौका विहार टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

औरंगाबाद - पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये नाशिक,अहमदनगर  जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे धरणातील पाणीसाठा 91.99% झाला आहे. परिणामी जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु करण्यात आला आहे.

यामुळे मागील चार दिवसांपासून  होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या दरवाजा क्रमांक-10 आणि 27 मधून 1048 क्युसेक तर जल-विद्युत केंद्रातून 1589 क्युसेक असा एकूण 2637 क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.

पाणी विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करु नये,नदी क्षेत्रात विहार करु नये अथवा जनावरांना मोकळे सोडु नये. नौका विहार टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जायकवाडी धरणाचे आज संध्याकाळी आणखी चार दरवाजे अर्ध्या फुटाणे उघडण्यात आले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दरवाजातून यातून अडीच हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज मध्यरात्री आणखी ४ दरवाजे अर्ध्या फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत. उद्या दिवसभरात जवळपास ८ हजार क्यूसेक्स पाणी १६ दरवाजातून पाणी सोडण्याचे नियोजन जायकवाडी पाटबंधारे विभागाचे केले असल्याची माहिती सकाळला मिळाली आहे. या १६ दरवाजसोबत उजव्या-डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water release from Jayakwadi Dam in Aurangabad