जम्बो किडस्‌च्या चिमुकल्यांनी दिला वृक्षसंवर्धनासोबतच पाणी बचतीचा संदेश

Water saving and tree conservation message rally by the Jumbo Kids school students
Water saving and tree conservation message rally by the Jumbo Kids school students

हिंगोली : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड महत्वाची असून त्यासोबतच पाणी बचत करणेही आवश्यक आहे, होळी सणाच्या वेळी वृक्षतोड करण्याऐवजी वृक्ष लागवड करून पाणी बचत करण्याचा संदेश पोदार जम्बो किडस्‌च्या चिमुकल्‍या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 19) दिला आहे. 

हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळीच्या सणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. याशिवाय कृत्रीम रंगाचा वापर धुलिवंदनासाठी केला जातो. त्यामुळे हा रंग डोळ्यात गेल्यास त्यापासून इजा होण्याची शक्यता असते. शिवाय रंग खेळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे याबाबत जनजागृतीसाठी पोदार जम्बो किड्सच्या विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी आज फेरी काढली होती.

येथील हनुमान नगरातून काढण्यात आलेल्या फेरीमध्ये प्राचार्य संजीव भारद्वाज, प्रशासन अधिकारी हरीदास रेड्डी, सहाय्यक प्रशासन अधिकारी गुरमीतसिंग संधू, मुख्याध्यापिका संध्यासिंह तोमर यांच्यासह पालक, शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचे महत्व पटवून दिले. होळीच्या सणासाठी वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून वृक्षतोड करण्याऐवजी वृक्ष लागवड करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पाणी बचत, नैसर्गिंक रंगाचा वापर करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा यावेळी दिल्या. या रॅलीनंतर शाळेमध्ये होळी निमित्त छोटेखानी कार्यक्रम घेऊन नैसर्गिक रंगाची उधळण केली. यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून जनजागृतीचे प्रयत्न : संध्यासिंह तोमर, 
मुख्याध्यापिका

पोदार जम्बो किडस्‌च्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात. त्यासाठी वार्षिक आराखडाच तयार केला जातो. यावर्षी पाणी बचत, वृक्षसंवर्धन व नैसर्गिक रंगाच्या वापरासाठी फेरी काढण्यात आली होती. या उपक्रमातून जनजागृतीचे प्रयत्न करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com