मराठवाड्यात पाणी पाणी रे... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अशी ही टंचाई 
जिल्हा...... गाव-वाड्या..........टॅंकर 
औरंगाबाद 297.......324 
जालना...... 42........49 
परभणी........17.......16 
हिंगोली........12.......11 
नांदेड..........60........67 
बीड..........05........05 

औरंगाबाद - उन्हाळा तप्त होत असताना मराठवाड्यात टंचाईचाही तीव्रता वाढत आहे. ग्रामीण भागातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत या टंचाईत 59 गाव-वाड्यांची भर पडली असून, टॅंकरच्या संख्येतही 76 ने वाढ झाली. 142 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 

पर्यावरणाचा ऱ्हास, पावसाचे घटलेले प्रमाण, उष्णतेमध्ये झालेली कमालीची वाढ या सर्वांचा परिणाम म्हणजे दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण होत आहे. आटत्या जलस्रोतांमुळे अधिकाधिक विहिरी अधिग्रहित कराव्या लागत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. त्यानंतर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यांचा क्रमांक लागत आहे. मागील आठवड्यात टॅंकर, टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी 863 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. आता हा आकडा 142 ने वाढून 1005 पर्यंत पोचला आहे. 

टंचाईग्रस्त गावे 363 
- वाड्या 70 
- अधिग्रहित विहिरी ः 1005 
- टॅंकरची संख्या 472
 

Web Title: Water scarcity in Marathwada