पाणीटंचाईच्या झळा तीव्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

औरंगाबाद - चांगला पाऊस झाला नसल्याने जलसाठे आटू लागले, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्रता आतापासूनच जाणवायला लागल्याने उन्हाळ्यात ही तीव्रता आणखी वाढणार या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सुमारे साडेसात कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या खर्चाच्या योजनांची कामे सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यामध्ये नळयोजना विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. 

यंदा पावसाने पाठ फिरविल्याने पिके हातची गेली असून, जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि माणसांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुढचा पावसाळा येण्यासाठी आणखी सात महिने जाणे बाकी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाणीटंचाईच्या झळा कमी करण्याच्या दृष्टीने टंचाई कक्षामार्फत नियोजन करण्यात आले आहे, यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ९८ कामांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी सिल्लोड तालुक्‍यातील गोकुळवाडी येथील टॅंकर भरणा केंद्र ट्रेंच व टॅंकर भरणा केंद्राचे आणि बोरगाव बाजार येथील नळयोजना विशेष दुरुस्तीची फक्‍त तीन कामे रद्द करण्यात आली असून, उर्वरित कामे मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्तावित करण्यात आले आहेत. कन्नड तालुक्‍यातून सर्वाधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत; तर सर्वांत कमी सोयगाव तालुक्‍यातील आहेत. सात कोटी ९६ लाख ६४ हजार ४७३ रुपयांच्या या योजना असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालुका             प्रस्ताव
कन्नड :     २७
खुलताबाद :    १६
सिल्लोड :     १५
औरंगाबाद :     १३
वैजापूर :     १०
फुलंब्री :     ०७
पैठण :     ०७
गंगापूर :     ०२
सोयगाव :     ०१

Web Title: Water Shortage