पाण्यावर कोणाचा डल्ला?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

औरंगाबाद - उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाण्याची ओरड सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी... पाणी... करीत नागरिक रस्त्यावर उतरत आहेत; तर दुसरीकडे पदाधिकाऱ्यांचा केवळ बैठकांचा फार्स सुरू आहे. सोमवारी (ता. सात) पुन्हा एकदा महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठक घेतली. त्यात २० एमएलडी पाण्याची तूट येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे २० एमएलडी पाणी जाते कुठे? याचा शोध घेऊन तूट कमी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

शहरातील पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाच-सहा दिवसांनंतरही नळाला पाणी मिळत नसल्याने नागरिक थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी गुलमोहर कॉलनीतील नागरिकांनी स्वतःच व्हॉल्व्ह फिरवून पाणी घेतले होते; तर शनिवारी (ता. पाच) सर्वसाधारण सभेत पाण्यावरून जोरदार चर्चा झाली. त्यात महापौरांनी सिडको-हडको भागाला दोन दिवसांआडच पाणी देण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही.

त्यामुळे सोमवारी दुपारी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी शहरात सध्या १३५ एमएलडी पाणी येते; तर जायकवाडी धरणातून १५५ एमएलडी पाण्याची उचल होते. शहराला २२५ एमएलडी पाण्याची गरज आहे, अशी माहिती दिली. काही ठिकाणी पाइपलाइनला गळत्या आहेत. जलकुंभ धुणे अशा कामांसाठी पाणी वापरले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते; मात्र गळत्यांचा शोध घ्या, बेकायदा नळ बंद करा, सिडको-हडको भागासाठी चार एमएलडी पाण्याची वाढ करावी, टाक्‍यांवर सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, असे आदेश महापौरांनी दिले. 

दोन एमएलडीची बचत 
महापालिकेतर्फे कंपन्यांना देण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन एमएलडी पाणी वाचल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. 

उपमहापौरांनी खडसावले 
उपमहापौर विजय औताडे यांनी फोन का घेत नाही, असे म्हणत कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना खडसावले.

Web Title: water shortage in aurangabad city