गोदामाईच्या पोटात पोखरण, "धरण उशाला अन्‌ कोरड घशाला...' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कुंभार पिंपळगाव, (जि.जालना) - गोदावरी परिसरातील राजाटाकळी-शिवणगाव बंधाऱ्यात यंदा पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे परिसर हिरवागार आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा बागायती क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले. शिवाय ऐन उन्हाळ्यात नदी-नाले खळखळून वाहत आहेत. दुसरीकडे गोदावरीच्या भादली, सिरसवाडी, गुंज या गावांच्या नदीपात्रांचा वाळवंट झाला आहे. 

अवैध वाळूउपसा 
गोदावरीच्या या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शिवणगाव बंधाऱ्यावरील गेटच्या अलिकडचे पात्र ओलांडण्यासाठी बोटीचा वापर करावा लागतो. दुसरीकडे गेटखालील पात्रात पाणी नसल्याने गोदापात्र ओसाड झाला आहे. वाळू उपशामुळे पात्रात मोठमोठे खड्डे होत आहेत. 

अलिकडे "सुकाळ', पलिकडे "दुष्काळ' 
दुष्काळजन्य परिस्थितीत भादली, सिरसवाडी, गुंज येथील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सध्या येथे वरच्या पात्रात पाणी आहे तर, खालील भागात जणू दुष्काळी परिस्थिती आहे, असे चित्र आहे. "धरण उशाला आणि कोरड घशाला' अशा परिस्थितीमुळे उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे. 

Web Title: water shortage in dist. jalna