तहानलेल्या गावांसाठी एसटी महामंडळ सरसावले

नांदेड - तहानलेल्या गावाची तहान भागविण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील काही गावांत ही योजना राबविण्यात येणार असून, नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून या उपक्रमाची सुरवात झाली.
नांदेड - तहानलेल्या गावाची तहान भागविण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील काही गावांत ही योजना राबविण्यात येणार असून, नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून या उपक्रमाची सुरवात झाली.

नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी
नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे महाव्यवस्थापक राजेंद्र जवंजाळ यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली. राज्यातील नऊ जिल्ह्यांतील आवश्‍यक त्या गावांना महामंडळातर्फे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

या प्रसंगी बोलताना जवंजाळ म्हणाले, 'महामंडळाकडे स्वतःच्या मालकीच्या कूपनलिका, विहिरी आहेत. त्यात मुबलक पाणी आहे. महामंडळाच्या आगारांत टॅंकरही आहेत. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी, "व्यथा तुमची, जाण माझी' न्यासाअंतर्गत महामंडळाने पाणीवाटप सेवा सुरू केली आहे. त्यासाठी महामंडळाने खर्चाची वेगळी तरतूद केलेली नाही. डिझेलसाठी येणारा खर्च महामंडळ करणार आहे. पहिल्या टप्प्यात नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलडाणा, नाशिक, नगर आणि सातारा जिल्ह्यांतील अति टंचाईच्या, अति गरजू काही गावांत आवश्‍यक तितके दिवस टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com