जायकवाडी धरणाचा पाणीसाठा पोहचला 15 टक्क्यांवर

जमील पठाण
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेले हे जायकवाडी आठवडाभरापूर्वी मृत साठ्यात होते. सध्या जायकवाडी धरणात गोदावरी नदीपात्रातून जवळपास ७० हजार क्यूसेक्स इतकी आवक सुरू आहे.

कायगाव : मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नसला तरी नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या कृपेने जायकवाडी धरणातील पाणीसाठा १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेले हे जायकवाडी आठवडाभरापूर्वी मृत साठ्यात होते. सध्या जायकवाडी धरणात गोदावरी नदीपात्रातून जवळपास ७० हजार क्यूसेक्स इतकी आवक सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात असाच दमदार पाऊस सुरू राहिला तर औरंगाबाद, जालना या शहरासोबत औरंगाबाद, जालना, नगर या जिल्ह्यातील जवळपास चारशे गावांची वर्षभराची चिंता मिटणार आहे. राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस होत असताना अजूनही मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water storage in Jayakwadi Dam at Aurangabad