जायकवाडीतील जलसाठा 2.96 टक्क्यांवर

आदित्य वाघमारे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नाशिक आणि गोदावरीच्या खोऱ्यात और असलेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी बुधवारी (ता. 31) जिवंत साठ्यात आली. 

औरंगाबाद : मराठवाड्याची तहान भागावणारे धारण म्हणून परिचित असलेले जायकवाडीमधील पाणी आता जिवंत साठ्यात आले आहे. नाशिक आणि गोदावरीच्या खोऱ्यात और असलेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी बुधवारी (ता. 31) जिवंत साठ्यात आली. 

वरील भागात सुरू असलेल्या पावसाने अनेक धरणे भरली असून त्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. बुधवारी (ता. 31) जयकवाडीकडे येणाऱ्या पाण्याचा ओघ हा दुपारी दोनपर्यंत 45 हजार 418 क्यूसेक एवढा होता. रात्री आठला हा किंचित कमी होऊन 45 हजार 082 एवढा झाला. यावेळी धरणाचा पाणीसाठा 1.05 टक्के एवढा झाला होता. गुरुवार (ता. 1) सकाळी आठपर्यंत हा ओघ 36 हजार 955 क्यूसेकवर आला. सकाळी आठपर्यंत जायकवाडी धरणाने 2.96 टक्के पाणीपातळी गाठली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water storage only 2 point 96 percent in Jayakwadi