बोजा चढविण्यासाठी सापडेनात मालमत्ता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

बीड - बीड जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरप्रकार झाले असून, शंभरावर योजनांमध्ये तर पैसे खर्च झाले; पण काम पूर्ण झाले नसल्याची परिस्थिती आहे. अशा योजनांच्या अध्यक्ष, सचिवांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिले. त्यानुसार संबंधित तलाठ्यांकडे प्रकरणेही पाठविण्यात आली; मात्र ज्यांच्या नावे बोजे चढवायचे आहेत, त्यातील बहुतांश व्यक्तींच्या नावे मालमत्ताच सापडत नसल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, बोजे चढविण्याचा बार फुसकाच ठरण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात गेल्या 12 वर्षांत स्वजलधारापासून ते राष्ट्रीय पेयजल आणि आता मुख्यमंत्री पेयजल अशा शेकडो पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र यातील अनेक योजना अद्यापही पूर्णच झाल्या नाहीत.

Web Title: water supply scheme scam property