परभणी - पहिल्याच पावसात बंधारे भरले

कैलास चव्हाण
मंगळवार, 5 जून 2018

परभणी : परभणी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार हजेरी लावली. सर्वच मंडळात कमी अधीक प्रमाणात पाऊस झाला असून 11.77  मिलीमिटर पावसाची नोंद झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. पहिल्याच पावसात जिंतूर तालुक्यातील खोलीकरण केलेले नाले भरले आहेत.

मागील एक तारखेपासून जिल्ह्यात अधुन-मधुन मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहे.रात्रीच्या सुमारास दररोज वादळी वारे वाहत आहेत. सोमवारी (ता. 4) रात्री आकराच्या सुमारास सुसाट वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली होती.सोबत विजांचा कडकडाट होता. रात्री एक वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.पहाटे पावसाचा जोर चागंलाच वाढला.

मंगळवारी उजाडल्यानंतरही पाऊस सुरु होता. सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे.दरम्याण जिंतुर तालुक्यात नुकत्याच केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा परिणाम म्हणून पहिल्याच पावसात खोलीकरण केलेले नाले, ओढे, समतल चर भरले आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी केली असून आता केवळ मॉन्सूनच्या दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

Web Title: water tank full in first rain