आमचं आधीच ठरलेलं; दोन महिने फक्त नाटक केलं : दानवे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच मी आणि अर्जुन खोतकर यांनी सेटलमेंट केली होती, त्यानंतर आमचे फक्त नाटक सुरू होते, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

जालना : लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वीच मी आणि अर्जुन खोतकर यांनी सेटलमेंट केली होती, त्यानंतर आमचे फक्त नाटक सुरू होते, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज (शनिवारी) रावसाहेब दानवे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार सुरेशकुमार  जैथलिया यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

दानवे म्हणाले की, लोक जेलमध्ये राहून निवडणूक जिंकतात, मी दवाखान्यात अॅडमिट राहून निवडणूक जिंकली. कारण माझा मतदारांवर विश्वास होता आणि माझी यंत्रणा काम करत होती. तसेच निवडणुकीपूर्वी मी सर्व तयारी केली होती. अर्जुन खोतकर आणि मी निवडणुकीच्या आधीच एकत्र बसलो होतो. त्यांनतर दोन महिने आमचे नाटक सुरू होते. 

लोकशाहीत भक्कम विरोधक आवश्यक असतो. त्यामुळे आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावत लोकांचे प्रश्न मांडणार, असे प्रतिपादन आमदार राजेश टोपे यांनी यावेळी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We already decided; two months we did the drama : Danve