एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नाही : प्रकाश आंबेडकर

कैलास चव्हाण
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

परभणी : वंचीत बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठींबा वाढला आहे. आगामी निवडणुकात कॉंग्रेसचा एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध आहे. त्यामुळे कॉंग्रेससोबत आली काय अन् नाही काय आम्ही एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नसल्याचे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता. 22) परभणीत जाहीर केले.

परभणी : वंचीत बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठींबा वाढला आहे. आगामी निवडणुकात कॉंग्रेसचा एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध आहे. त्यामुळे कॉंग्रेससोबत आली काय अन् नाही काय आम्ही एमआयएमशी असलेली मैत्री तोडणार नसल्याचे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता. 22) परभणीत जाहीर केले.

लालसेना आयोजित सत्ता संपादन परिषदेनिमीत्त अॅड. आंबेडकर सोमवारी परभणीत आले असता त्यांनी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. पुढे ते म्हणाले, बहुजन वंचीत आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लहान ओबीसी वर्गातून पाठींबा वाढत आहे. त्यामुळे विधानसभेच्या 50 जागा या वर्गाला दिल्या जाणार आहेत. या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी एका राष्ट्रीय पक्षाकडून हीन पातळीवर टिका केली जात आहे. औरंगाबादच्या मेळाव्यानंतर शिवसेना, भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून हिडीस वृत्ती दाखवण्यात आली आहे. याचा आपण निषेध करतो असे ते म्हणाले.

एल्गार परिषदेनंतर मराठा आणि ओबीसी समाजात वाढलेल्या दरीला भाजपाकडून खतपाणी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. जातनिहाय जनगणना झाली पाहीजे या ओबीसींच्या मागणीला भारीपचा पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत बहुजन वंचीत आघाडीची  केवळ एकच बैठक झाली आहे.मात्र त्यांनी एमआयएमला अप्रत्यक्षरित्या विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप यावर निर्णय दिला नसल्याने राज्यातील नेतृवाकडून बोलणी थांबली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आली काय किंवा नाही काय एमआयएमशी मैत्री तोडणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

वंदेमातरमला विरोधच
एमआयएमचा वंदेमातरमला विरोध आमचा सुध्दा आहे. मात्र राष्ट्रगीताचा आम्हीच काय संपूर्ण देश सन्मान करतो. एक राष्ट्रगीत असताना अन्य गीताचा अट्टाहास का असा प्रश्न करीत वंदेमातरमला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: we are not breaks friendship with MIM says Prakash Ambedakar