मला बोलू द्या, मोदींवर विश्वास ठेवून मला निवडलंय; खासदाराची मराठीतून व्यथा

मला बोलू द्या, मोदींवर विश्वास ठेवून मला निवडलंय; खासदाराची मराठीतून व्यथा

नवी दिल्ली- मी सकाळपासून जेवणही केलं नाही. मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेऊन 1 लाख 28 हजार मतांनी विजयी करुन लोकांनी मला या सभागृहात पाठवलंय. कारण, मोदींनी दिलेला शब्द ते पूर्ण करतील, अशी अपेक्षा या लोकांना असल्याची वल्गना आज उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत केली. त्यांनी संसदेत तडाखेबंद मराठी भाषण केले. अर्थसंकल्पावरील अभिनंदन भाषणात बोलताना ओमराजे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची आठवण करुन देत मराठवाड्यासाठी पाण्याची मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी औसा येथील मतदारसंघात निवडणूक प्रचारावेळी जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्यांनी त्याची अंमलबजावणीही सुरू केल्याचे निंबाळकर यांनी म्हटले. लोकसभा सभागृहात चक्क मराठीतून जोरदार भाषण करताना, आम्हाला कुठलंही पॅकेज नको, आम्हाला कुठलिही आर्थिक मदत नको. आम्हाला कर्जमुक्तीही नको. पण, माझ्या मराठवाड्याला आमच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी द्या, अशी मागणी ओमराजे यांनी केली.

ओमराजे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची उदाहरणंही दिली. मतदारसंघातील एका मुलीनं वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आत्महत्या केली. एका विद्यार्थ्यानं 94 टक्के गुण घेऊनही शिक्षणाचा खर्च शक्य नसल्याने आत्महत्या केल्याचं ओमराजे यांनी सांगितलं. केवळ, पाणी नसल्यानं शेती पिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर, मतदारसंघातील नागरिकांवर ही टोकाची भूमिका घेण्याची वेळ येत असल्याचंही ओमराजे यांनी म्हटलंय.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com