रस्ता, शाळेसाठी एकोपा दाखवा - पवनीत कौर

प्रकाश बनकर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - चाळीसहून अधिक वर्ष जुन्या शाळेच्या विकासाठी स्कोडा कंपनीने पुढे येत बदल घडवून आणला. मात्र गावातील अंतर्गत राजकारणामूळे शाळेकडे येणाऱ्या रस्ताच झाला नाही. हे राजकारण बाजूला ठेवून रस्ता आणि शाळेसाठी सर्व गावकऱ्यांनी एकोपा दाखवण्याची गरज आहे. वरझडी गावातून जिल्हा परिषदेच्या शाळेकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी बुधवारी (ता.28) जाहिर नाराजी व्यक्‍त करताना गावकऱ्यांना टोला लावला. त्यांच्या या वक्‍तव्यामूळे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या मतदारसंघातील या गावचे अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे. 

वरझडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत स्कोडा कंपनीने केलेल्या विविध कामाचे उद्‌घाटनासाठी पवनीत कौर आणि शिक्षण अधिकारी आले होते. कौर म्हणाल्या, मी दुसऱ्या वाहना आणले असते तर कदाचित शाळेपर्यंत पोहचू शकले नसते. गावातून शाळेकडे येतानाच गावात अंतर्गत राजकारण जास्त असल्याचं जाणवलं. असे सांगताच गावातील मंडळीच्या चेहऱ्यावर आड्या उमटल्या. केवळ स्कोडा कंपनी देत आहे. अवलंबून राहू नका, मदतीची अपेक्षा न करता गाकवऱ्यांनी स्वत: पुढे येण्याची गरज आहे. पण येथे स्वत:हून कोणी पुढे येणार दिसत नाही. यापुढे जिल्हा परिषदेच्या सीईओना पुन्हा शाळेत किंवा गावात बोलवायचं असेल तर काहीतरी काम करून तुम्ही दाखवचं. फक्‍त स्कोडा कंपनी किंवा बाहेरचं सीएसआरच्या कामामूळे सीईओ येणार असे तुम्ही अपेक्षित करू नका. आज फक्‍त स्कोडांने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना मदत केली आहे. पण गावकऱ्यांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी काय काय केले आहे. ते दिसून येत नाही. शाळेची पटसंख्या कमी झाली आहे. सर्वांनी सक्रीय व्हावे, तुम्हाला पैसाची कमतरता नाही. स्कोडा तुम्हाला देणार. यामूळे एकोपा दाखवत गावाचा शाळेचा विकास करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Web Title: we have to change for school - pavneet kaur